महिलांनी छोटे-मोठे पण चांगले काम व शिक्षण घेवुन मिळेल ती नोकरी करून आदर्श निर्माण करावा !! प्रा जयश्री काळवीट यांचे प्रतिपादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ ऑगस्ट २५ मंगळवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कवयित्री तथा उपशिक्षिका जयश्री काळवीट यांच्या उपस्थितीत युवती सभेचे उद्घाटन संपन्न झाले.दरम्यान हाताला येईल ते छोटे-मोठे पण चांगले काम व शिक्षण घेऊन मिळेल ती नोकरी व व्यवसाय करुन एक आदर्श जीवन जगत समाजातील आपले दुय्यम स्थान नाकारुन आत्मनिर्भर बना असा मोलाचा सल्ला युवती सभेच्या उद्घाटक जयश्री काळवीट यांनी आपल्या भाषणातून प्रतिपादन केले.तसेच बाह्य सौंदर्यांची काळजी घेण्यापेक्षा आपल्या आंतरिक सौंदर्यांला अधिक सुंदर करा व दिसण्यापेक्षा असणे गरजेचे आहे म्हणून चांगली पुस्तके वाचा त्यांचे तेज आपोआप तुमच्या व्यक्तीमत्वातून झळकेल असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी आपल्या मनोगतात मुलींना संबोधित करतांना दररोज नियमितपणे चांगल्या पुस्तकाचे एक पान जरी वाचले तरी तुमचे जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही दिली.समाजात तसेच चारचौघात वावरतांना नेहमी सतर्क रहा,स्वतःला व्यवस्थितपणे सादर करा आणि आपल्यासह आई-वडिलांचे,शिक्षकांचे,समाजाचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा असेही त्या म्हणाल्या.प्रास्ताविक व सुत्रसंचालन युवती सभेच्या समन्वयिका प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रुपाली शिरसाठ यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम डी खैरनार,उपप्राचार्य प्रा.डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.आर.डी.पवार,डॉ.एस.आर.गायकवाड,प्रा.सोनाली पाटील,प्रा.भावना बारी,प्रा.निकिता पाटील,प्रा.मयुर सोनवणे,प्रा रत्नाकर कोळी,प्रा.रामेश्वर निंबाळकर प्रा.प्रशांत मोरे ,प्रा अरुण पावरा,डॉ.संतोष जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.