यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २५ शुक्रवार
येथील व्यासनगरी येथील चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे हे ५१ वे वर्ष असून समाजसेवा,समाज प्रबोधन व नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून गणेश उत्सव कालावधीत विविध समाजसेवी व समज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा दि.२७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २५ या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्याचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.यात दि.२७ ऑगस्ट २५ बुधवार रोजी दुपारी २ वाजता गणपती बाप्पांचा आगमन सोहळा तर गणेशोत्सव काळात इतर दिवशी सामूहिक अथर्वशीर्ष पठण,संगीतमय सुंदरकांड व भजन संध्या,जयबाबा अमरनाथ महादेव दिव्य दर्शन या कार्यक्रमांसह शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी दि.३० ऑगस्ट २५ शनिवार रोजी सकाळी १० ते रात्री १० याकालावधीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत कार्ड योजना अंतर्गत शहरासह परिसरातील जेष्ठ नागरिकांसह सर्वांची आयुष्यमान भारत कार्ड योजना ईकेवायसी व लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात येणार आहे.यात सकाळी १० वाजता आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड शिबीराची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात व रात्री ७ वाजेपर्यंत नोंदणी व के वाय सी पूर्ण करणे तसेच मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.सदरील आयुष्यमान भारत कार्ड योजना ईकेवायसी व लाभार्थ्यांना कार्ड वाटपाकरिता आपले सरकार व सेतू सुविधा सेवा केंद्र चालक धनंजय सराफ यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.तरी शहरातील व परिसरातील गणेश भक्तांनी गणेशोत्सव काळातील काळातील समाज प्रबोधन व समाज उपयोगी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष महेश वाणी,उपाध्यक्ष जगदीश कवडीवाले,सचिव प्रशांत श्रावगी,खजिनदार अजय गडे तसेच समस्त चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळ सदस्य,कार्यकर्ते व समाजबांधव यांनी केले आहे.