जावेद शेख,पोलीस नायक
भडगांव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२७ ऑगस्ट २५ बुधवार
आस्था,भक्ती,अखंड सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक असलेला हरतालिका तीज उत्सव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख मा.नगरसेविका योजना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातवरणात साजरा करण्यात आला.
दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित माता,भगिनी,युवती,महिला यांचे वतीने भगवान शिव व माँ पार्वती आराधनेत विधिवत पूजेद्वारे सुख संपन्न प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.सदर अभियान प्रमुख योजना पाटील,सुमित्रा गायकवाड,बेबाताई पाटील,निता पाटील,रुपाली पाटील,आशा मनोरे,भारती देशमुख,ज्योती बाविस्कर,प्रतिभा शितोडे,नेहा गायकवाड आदी युवती महिला यांच्या उपस्थितीत गुरुदेव पुराणिक यांचे कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन लाभले.सदरील कार्यक्रम विधिवत व मनोभावे उत्साहात साजरा करण्यात आला.