Just another WordPress site

यावल येथील श्री कालीका पतसंस्था चेअरमन आर्थिक गैरव्यवहाराचे विनिर्दिष्ट अहवाल पत्र सादर करण्याचे सहकार निबंधक यांचे आदेश !!

तक्रारकर्ते नितिन सोनार यांच्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना अखेर यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार

येथील विविध आर्थिक गोंधळाच्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या श्री कालीका नागरी सहकारी मर्यादीत पतसंस्थाच्या चेअरमन विरूद्ध लेखा परिश्रण अहवालच्या अनुषंगाने सदर संस्थेत अफरातफर व आर्थिक गैरव्यवहार झाले असल्यास निष्कर्षापर्यंत आले असल्याचे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार कार्यवाहीचे संकेत मिळाले असल्याची माहिती तक्रारकर्ते नितिन श्रावण सोनार यांनी दिली असुन त्या भ्रष्ट चेअरमन विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे.

दरम्यान यावल येथील नितिन श्रावण सोनार यांनी श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत यावलच्या कारभारात दिनांक १७/४/ २०१७ ते ३१/०३/२०२५ या कालावधीत झालेल्या लेखा परिश्रणाच्या अहवाला नुसार संबधीतांवर गैरव्यहार करण्याबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांच्याकडे सुमारे दहा वर्ष पाठपुरावा केला.सदरहू अखेर या पाठ पुराव्याला यश आले असुन सदर लेखा परिश्रण अहवालाचे अनुषंगाने यावल येथील रहीवाशी असलेले सामाजीक कार्यकर्ते नितिन श्रावण सोनार यांनी विनिर्दिष्ट अहवालानुसार गैरव्यहार झाले असल्यास त्या निष्कर्षापर्यंत आपण आलो असल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ (ब) मधील तरदुती नुसार त्यासंबंधीचा विनिर्दिष्ट अहवाल सादर करण्याबाबत आपल्या स्तरावर संबंधीतांवर उचित कार्यवाही करावी असे नमूद केले आहे.या पत्राच्या अनुषंगाने आता श्री कालिका सहकारी पतसंस्थेचे चेअरमन यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारावर कार्यवाही मार्ग मोकळा झाल्याने नितिन सोनार यांनी सांगीतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.