यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार
येथील श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था व शहरातील सलून व्यवसाय करणारे हिंदु-मुस्लिम खलिफा न्हावी यांच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात नुकतेच निवेदन देण्यात आले. सदरहू शहरातील बाबूजी पुरा भागात सलून व्यवसाय करणाऱ्या तरुणाने बालकाची निर्घृण हत्या केल्याबद्दल या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला व सदर दोषी तरुणाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान शहरातील बाबूजी पुरा भागात एका पाच वर्षीय बालकाची सलून व्यवसायिक असलेल्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी वय २२ या तरुणाने निर्घृण हत्या केली होती.या घटनेच्या निषेधार्थ यावल येथे श्री जिवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था व शहरातील हिंदु-मुस्लिम खलिफा न्हावी बांधव यांनी एकत्र येत तसेच सलून व्यावसायिक संघटना यांनी एकत्र येऊन यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन दिले.बाबूजीपुरा भागात राहणाऱ्या बालकाची हत्या करणाऱ्या शेख शाहिद यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्याचे कृत्ये हे अमानवीय कृत्य असून त्याचे कोणीच समर्थन करणार नाही.तरी जलद न्यायालयात खटला चालवून त्याला कठारोत कठोर व फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.प्रसंगी अनिल चौधरी,सईद रऊफ न्हावी,सुपडू वारूळकर,समसोद्दीन मोईनोद्दीन,अमोल आमोदकर,शहाबुद्दीन मोईनोद्दीन,राजेंद्र चौधरी,शेख रऊफ न्हावी,ईश्वर सोनवणे सह मोठ्या संख्येत सलून व्यवसायिक व न्हावी समाज बांधव,मुस्लिम खलिफा न्हावी बांधव उपस्थित होते.