पाचोरा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार
राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाचोरा येथील अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्था संचलित सुमनताई पाटील बी.एड.कॉलेजचे प्राचार्य डॉ.नाना लांडगे यांना “जीवन गौरव पुरस्कार-२०२५” या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.दरम्यान रवींद्र भैय्या पाटील व संस्थाध्यक्षा संदिपा वाघ व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ.नाना लांडगे यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ.नाना लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने तसेच मित्रमंडळी,नातेवाईक व आप्तेष्टांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
प्रा.डॉ.नाना लांडगे यांचा शैक्षणिक प्रवास पुढीलप्रमाणे आहे…… !!
प्रा.नाना लांडगे हे मूळचे बारामती तालुक्यामधील मालेगाव बुद्रुक येथील असून नोकरीसाठी ते खानदेशात आले.लहानापासून सामाजिक जाण,भान आणि निस्वार्थ सेवा हे त्यांच्या जीवनातील निर्मळ सत्य कायम राहिले.त्यांना महाविद्यालयीन जीवनात नाटक बसविणे व अभिनय करण्याची आवड कायम होती.एकदा स्नेहसंमेलन निमित्त स्क्रीन टेस्ट घेतली पण निवड झाली नाही.मात्र सामाजिक पातळीवर गावामध्ये तीन अंकी,दोन नाटके,चला भाऊ गाळा खाऊ,हत्या ही नाटके सादर केली.झाडे लावणे,भटके विमुक्तसाठी रेशन कार्ड व ठाण्यासाठी जागा मिळविण्यासाठी मित्र अडसूळ व सेवादलाच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले.तसेच वस्तीवरील पाण्यासाठीच्या हातपंप दुरुस्ती असेल,वस्तीवरील प्राथमिक शाळेत मुलांना शिकविणे असेल,खेळ घेणे,याशिवाय बालसंस्कार केंद्र चालविणे,स्वाध्याय परिवारात कृतीयुक्त कार्यकर्ता म्हणून काम केले.’नाठाळ तलाठी गरीबाची दैना’ ही बातमी तत्कालीन केकावली या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली व आमच्या कार्याला ओळख मिळाली.यावेळी या साप्ताहिकाचे संपादक अमर साबळे यांचे सहकार्य मिळाले.
याच काळात बारामती शहरात चौका चौकात दिंडी नावाचे पथनाट्य सादर केले.यावेळी आजचे चित्रपट व मालिकांमधील अभिनेते प्रदीप कौथमीरे यांची सोबत मिळाली.सन १९८७ ते १९८९ मध्ये पुणे विद्यापिठात एम.ए.केले.सन १९९१-९२ मध्ये बी.एड.व एम.एड.केले.याच काळात डिप्लोमा इन लेबर लॉ केले.या दरम्यान प्रा.गोडबोले यांचेमुळे तीन अंकी नाटक करण्याची संधी मिळाली.’घेतले शिंगावर’ व ‘वरचा मजला रिकामा’ अशी होती.पुढे चरितार्थासाठी बारामती येथील बी.एड.महाविद्यालयात अधिव्याख्याता झालो.पुढे दोंडाईचा व नंतर खिरोदा येथे कायम झालो.याकाळात सामाजिक व शैक्षणिक कार्य सतत सुरूच होते.सन १९९३ मध्ये राष्ट्रीय महाविद्यालय चाळीगाव येथे संरक्षणशास्त्र विषयासाठी अधिव्याख्यात म्हणून निवड झाली परंतु सामाजिक जाणीव व संवेदनशील मानसिकतेमुळे समोर या नोकरीसाठी आवश्यक गरज असलेल्या भगिनीसाठी त्यांना माझ्याऐवजी दुसरा नेमण्यासाठी नाहरकत पत्र (NOC) दिली.याकामी त्यांच्या पत्नीच्या परवानगीने त्यांनी एन.ओ.सी.नो ऑब्जेक्शन पत्र दिले व ती जागा या महिलेसाठी रिक्त केली.
परंतु अस म्हणतात परमेश्वर विसरत नाही पुढे सन १९९४ मध्ये मी खिरोदा बी.एड.कॉलेजला अधिव्याख्याता म्हणून त्यांची निवड झाली.या परिसरातील मानस माणुसकीची,रोझादा खिरोदा परिसरात अनेक मित्र मिळाले.कै.मधुकररावगी चौधरी माजी शिक्षण मंत्री यांचे सानिध्य लाभले.पुढे मा.शिरिषदादा व धनंजयभाऊ शिरीष चौधरी यांचे सानिध्य लाभाले.येथे खुप शिकण्याची व विविध गुणांच्या विकासास संधी मिळाली.सन १९९५ मध्ये वसतिगृहाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली.येथील सामाजिक,शैक्षणिक आणि भौगोलिक वातावरणाशी सांगड घालताना कोणी तरी आपली नोंद घेत आहे हे मला सन २००३ मध्ये मिळालेल्या ‘दादोजी कोंडदेव आदर्श शिक्षक पुरस्काराने दाखवून दिले.त्यानंतर महात्माफुले शिक्षक पुरस्कार मिळाला.पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मता फेलोशीप,अपंग सेवा सन्मान पत्र मिळाले व तीच आवड कायम राहिली.शैक्षणिक काम करतांना केलेल्या कार्याची वेगळी ओळख मिळाली.सन २०२३ रोजी ते शिक्षण क्षेत्रातील सेवेतून निवृत झाले.या कालावधीमध्ये अभ्यासक्रमाशी निगडित चार पुस्तके व दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले व निवृत्ती नंतरही तोच शिरस्ता कायम राखला.सन २०२३-२४ पासून पाचोरा येथील अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्था सुमनताई पाटील बी.एड.कॉलेजात प्राचार्य म्हणून कार्य सुरू केल्याचा खरच आनंद वाटतो.कारण येथे काम करीत असतांना डॉ.नाना लांडगे यांना नुकताच राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्कार २०२५ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
कधीही कुणीतरी स्तुती अथवा नोंद घ्यावी या उद्देशाने काम केले नाही तर प्रमाणिकपणे सरळ,नम्र आणि कोणतेही काम अगदी मनापासून करण्याची जिद्द आणि आपल्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतली.या काळात अनेकांची साथ लाभली.विद्यार्थी हेच खरे देवात आणि प्रेरणा होय याचमुळे माझ्या अनेक गुणांना संधी,व्यासपीठ मिळाले.सामाजिक व शैक्षणिक कार्याला संधी मिळाली.बी.एड.महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.निवृत्ती नंतर भुसावळ येथे घेतलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात माझ्या पुस्तकाचे प्रकाशन धनंजय चौधरी यांच्या हस्ते झाले.अनेक विद्यार्थी आजही मला जाणीव पूर्वक फोन करतात जे जोडले ते जोडले रस्त्यात कोठेही भेटले की त्यांनी केलेला नमस्कार मला कार्यप्रवण बनवतो हीच डॉ.नाना दांडगे सरांची शिदोरी आहे.
धन्यवाद!