डॅा.मेत्ता ढाले यांची वैद्यकीय क्षेत्रात गरुड भरारी !! ‘पॅथॅालाजी’ वैद्यकीय शास्रात मास्टर डीग्री मिळवीत सुवर्ण अक्षरांनी कोरले नाव !!
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ नोव्हेंबर २५ मंगळवार
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा येथील प्रतिष्टीत व्यक्ती सन्मानीय सिताराम सुका तायडे यांचे पुत्र आयू.पितांबर सिताराम तायडे व डॉ.डिगंबर सिताराम तायडे यांची नात कुमारी डॅा.मेत्ता मिलींद ढाले यांनी वैद्यकीय क्षेत्रात गरुड भरारी घेत नुकतीच ‘पॅथॅालाजी’ या वैद्यकीय शास्रात मास्टर डीग्री मिळवीत आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.डावणगेरे येथील जेजेएम मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला.यावेळी जेजेएम मेडिकल कॉलेजचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख आणि प्रमुख पाहुणे मणिपाल इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल चेनचे प्रमुख (बंगलोर) यांच्याकडून कुमारी डॅा.मेत्ता मिलींद ढाले यांनी पॅथॅालाजी’ या वैद्यकीय शास्रात मास्टर डीग्री हि पदवी स्वीकारली.

दरम्यान डॅा.मेत्ता ढाले यांनी करोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र ऋग्णांची सेवा केली आहे हे विशेष !.कुमारी डॅा.मेत्ता मिलींद ढाले या वैद्यकीय शास्रात मास्टर डिग्री मिळविणाऱ्या तायडे व ढाले परीवारातील एकमेव मुलगी आहे.डॅा.मेत्ता ढाले हिला तिची आई डॅा.अनिता (तायडे) ढाले व पिता मिलींद ढाले यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले.डॅा.मेत्ता ढाले या “पद्मश्री-२०२६” नामांकन प्राप्त तसेच “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार-२०२५ पुरस्कारासह विविध पुरस्कार प्राप्त असलेले डॉ.डिगंबर तायडे त्याचबरोबर आपल्या गायन,समाजसेवा व सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून पन्नासच्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ट्राफी,पदके,सन्मानपत्रे व पारितोषिके मिळविलेली भारतातील नंबर वन ठरलेली जोडी तसेच डॉ.डिगंबर तायडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी सदैव उभ्या राहून खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका व गायिका शकुंतला तायडे यांची भाची आहे.सदरहू डॅा.मेत्ता ढाले यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे नातेवाईक,आप्तस्वकीय, मित्रमंडळी व डोंगर कठोरा येथील संपूर्ण तायडे परीवार व ग्रामस्थांच्या वतीने कौतूक होत आहे.