Just another WordPress site

यावल ते सुने सावखेडा देव दर्शनासाठी निघालेल्या श्रीराम भक्तांचे आमदार अमोल जावळेंनी केले स्वागत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी)

दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार

येथील माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील मित्र मंडळ व यावल शहरातील सकल श्रीराम भक्त परिवार यांच्या संयुक्तपणे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील यावल श्री व्यास नगरी ते सुने सावखेडा येथील हनुमान मंदीरापर्यंत तरूण व महिलांनी सुमारे ५० किलोमिटरची पदयात्रा करीत दर्शन घेतले.

दरम्यान चितोडा,सांगवी,भालोद मार्ग गेलेल्या भाविकांच्या पदयात्रेचे भालोद येथे रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी भाविकांचे स्वागत केले.प्रसंगी सांगवी,भालोद व बामणोद या ठीकाणी दर्शनासाठी निघालेल्या पदयात्रेचे ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम भक्ताचे स्वागत करीत त्यांच्या करीता चहा आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी मोठया संख्येत असलेल्या भक्तांच्या यावल ते सुने सावखेडा या ठीकाणी देवदर्शनासाठी शिस्तीने निघालेल्या श्रीराम भक्तांच्या पदयात्रेने अनेकांचे लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.