Just another WordPress site

मृत सैनिकाच्या आईला १o वर्ष नंतर पेन्शन सुरु !! बीएसफचे सहा.उप निरीक्षक महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नांना यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ जानेवारी २६ गुरुवार

सांजोरी तालुका जिल्हा धुळे येथील २४ वी बटालियन सीमा सुरक्षा बल मध्ये कार्यरत स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर (पाटील) यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांचे आईला माहे डिसेंबर २०१५ पासून पेंशन बंद झाले होते.याबद्दल मृत्यु झालेले सैनिक यांचे आई श्रीमति आशाबाई यशवंत पाटील यांनी सीमा सुरक्षा बल चे उच्च मुख्यालय सह माननीय न्यायालयात धुळे येथे आवेदन केले होते परंतु नंतर ही गरीब अडानी आई जी मोलमजूरी करत होती व आपल्या लहान मुलासह आपला कसा तरीउधार निर्वाह करत होती.

दरम्यान न्यायालयींन व कार्यलयींन खर्च न करता आल्याने त्यांचे आर्थिक परीस्थितिने पेंशन केस कड़े दुर्लक्ष झाले.परंतु वर्ष २०२३ मधे मृत्यु झालेले सैनिक अनिल पाटील यांचे बतालियन मधे त्यांचे सोबत कार्य केलेले मुख्य आरक्षक प्रकाश पाटील यांनी ही सारी विस्रुत माहिती गाव विरावली तालुका यावल जिल्हा जळगावचे सीमा सुरक्षा बल मधे कार्यरत असलेले सहा.उप निरीक्षक व क्लर्क महेंद्र पुण्डलिक पाटील यांना दिली.या आधी सैनिक महेंद्र पाटील यानी असेच ४ विरमाता यांना पेंशन मिडवून देनेस मदत केले आहे आणि त्याना चांगला अनुभव आहे.या बद्दल माहिती मिडताच सैनिक महेंद्र पाटील यानी तत्काल धुळे येथे जात सारे पत्राचार जमा केले आणि या ही वीरमातेला मदतीचा हात पुढ़े केला आणि या कामात त्याना धुळे जिल्हा न्यायालयचे कार्यरत जेष्ठ वकील किरण कुमावत यानी ही तत्काल मदत करनेस तयार झाले व त्यानी नियमित डिपारर्मेंट सोबत सैनिक महेंद्र पाटील यांचे संगितले प्रमाणे नियमित स्वखर्चा ने पत्र व्यवहार करत गेले यात सैनिक महेंद्र पाटील यानी दिल्ली चे सैनिक चे पेंशन कार्यलयाला स्वत जाऊन कागद पत्राची पुर्तता केली आणि याकामी सांजोरी चे रहिवासी दिल्ली येथे केंद्रीय औदोगिक सुरक्षा बल चे कार्यरत सैनिक भानुदास पाटील यांचीही मदत लाभली.स्वर्गीय सैनिक अनिल यशवंत मगर (पाटील) यांचे आई श्रीमती आशाबाई यशवंत पाटील यांना आज सारे थाकित रक्कम प्राप्त झाली आणि आता निरंतर पेन्शन ही भेटनार आहे.ही थकित राशि प्राप्त केले नंतर श्रीमती आशाबाई यशवंत पाटील यांना आपल्या शहीद मुलाच्या स्मुर्तिनी अश्रु अनावर झाले आणि त्यानी १० वर्षानंतर पेंशन मिडवून दिले कामी मदत करणारे धुलेचे जेष्ठ वकील किरण कुमावत,मुख्य आरक्षक प्रकाश पाटील,दिल्लीचे भानुदास पाटील सह सीमा सुरक्षा बल चे महेंद्र पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.