यावल येथील आकाश कवडीवाले यांची थायलंडच्या आतंरराष्ट्रीय युनिलॅम्प लाईटिंग कंपनीत व्यवस्थापकपदी निवड !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० जानेवारी २६ शनिवार
येथील जेष्ठ पत्रकार राजु कवडीवाले यांचे चिरंजिव आकाश कवडीवाले याची थायलंड देशातील युनिलॅम्प लाईटींग या आंतरराष्ट्रीय कंपनीत भारतासह नजीकच्या सार्क देशाचे प्रादेशीक व्यवस्थापक म्हणून नुकतीच पदोन्नती झाली आहे.आकाश कवडीवाले यांच्या पदोन्नतीची घोषणा ५ जानेवारी रोजी करण्यात आली.
दरम्यान सार्कसाठी आकाश कवडीवाले याने कंपनीत कार्यरत असतांना पश्चिम भारतातील कामकाजाचे तीन वर्षे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर त्याची भारतासह बांगलादेश, श्रीलंका,नेपाळ,पाकिस्तान,भूतान,मालदीव आणि अफगाणिस्तान यासारख्या आठ देशांच्या सार्क बाजार पेठांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.या काळात त्याने युनिलॅम्पच्या उत्पादन श्रेणीचे सखोल ज्ञान विकसित केले आहे.प्रकाशयोजना डिझाइनर्स,चॅनेल भागीदारांशी मजबूत संबंध निर्माण केले आहेत आणि संपूर्ण प्रदेशातील वास्तु शिल्पीय बाह्य प्रकाश बाजारपेठेची स्पष्ट समज दाखवली आहे.सदरहू आकाश कवडीवाले यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.