यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ जानेवारी २६ मंगळवार
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार परिसरातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी शासकीय भरड धान्य केंद्र यावलचा शुभारंभ काल दि.१२ जानेवारी सोमवार रोजी विविध मान्यवर मंडळी व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत यावल येथील सातोद मार्गावरील शासकीय गोदामात करण्यात आला.याप्रसंगी काटा पूजन व धान्य पूजन रावेर यावल विधानसभेचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचने वरून सर्वप्रथम धान्य विक्रीलाआलेले शेतकरी दहीगाव येथील भास्कर नागो फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रथम केंद्रावर धान्य विक्री करता आलेल्या अन्नदाता शेतकरी बांधवांचे शासनाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सदरील भरड धान्य केंद्र कोरपावली वि.का.सोसायटी चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शना खाली सुरू झाले.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,पुरवठा अधिकारी अभिमन्यू चऱ्हाटे,गोदाम अधीक्षक वाय.डी.पाटील,सुकलाल कोळी,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्जेनसिंग राजपूत,कृउबाचे माजी सभापती कृषिभूषण नारायण चौधरी,बाजार समिती संचालक हर्षल पाटील,सागर महाजन,शेतकी संघ संचालक तेजस पाटील,कोरपावली सोसायटीचे सचिव मुकुंदा तायडे यांसह तालुक्यातील पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी बांधव या ठीकाणी उपस्थित होते.केन्द्र शासनाच्या भरडधान्य खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असुन कोरपावली वि.का.सोसायटी चेअरमन व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे यांनी शेतकऱ्यांचे स्वागत करीत आभार मानले.