Just another WordPress site

यावल येथे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने समितीची स्थापना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ जानेवारी २६ बुधवार

येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एका समितीची सर्वानुमते स्थापना करण्यात आली.

सदर समितीच्या अध्यक्षपदी राहुल राजेंद्र कचरे,उपाध्यक्षपदी नरेंद्र शिंदे,खजिनदार पदी गौरव जोशी तर सचिव पदी नरेंद्र (खन्ना) माळी यांची निवड करण्यात आली.तसेच सदस्य पदी मयूर खर्चे,सारंग बेहेडे,मनोज करनकर,पिंटू कुंभार,योगेश राजपूत पाटील,अजहर खाटीक,राहुल पवार,भूषण खैरे,किशोर (गोलू)माळी,जयेश तुकाराम बारी यांची तर सल्लागार समितीत नगराध्यक्षा छाया पाटील,तालुका प्रमुख शरद कोळी,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,नगरसेवक सागर चौधरी,नगरसेविका वैशाली बारी,पप्पू जोशी,संतोष खर्चे,योगेश चौधरी,विजय पंडित,प्रल्हाद बारी,हारून खान यांची निवड करण्यात आली.यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सदर बैठकीचे सविस्तर माहिती प्रास्ताविक जगदीश कवडीवाले यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.