Just another WordPress site

राज्यात हरभरा पिकांचे विक्रमी उत्पादन वाढण्याचे संकेत असल्याने शेतकऱ्यांनी ई पिक पाहणीवर भर द्यावा -राकेश फेगडे यांचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३१ जानेवारी २६ शनिवार

यंदा भविष्यात राज्यात आणी तालुक्यात हरभरा पिकाचे उत्पादन विक्रम गाठणार असुन शेतकरी बांधवांनी आजच आपल्या हरभरा पिकांची सात बारा ई-पिक पाहणीच्या माध्यमातुन तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन तालुक्यातील कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे.

दरम्यान कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन केन्द्र शासनाच्या हमी भावात सद्यस्थितीला सोयाबीन खरेदीला शेतकरी बांधवांच्या वतीने हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहीती मिळाली असुन काल दि.३० जानेवारी पर्यंत २२२१ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे.तसेच भरड धान्य खरेदीला मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहीती सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली आहे.यात १९९ नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी मका पिकाची तर ३९२ ज्वारी उत्पादन करणारे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून आजपर्यंत १७६ शेतकरी बांधवांकडून १५०० क्विंटल ज्वारी आणी १२०० क्विंटल मका खरेदी  करण्यात अली आहे.दरम्यान सदरच्या धान्य खरेदीला विलंब होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे सांगुन शनिवार व  रविवार हे सुटीचे दिवस असुन प्रशासकीय सुटयांच्या गोंधळामुळे देखील धान्य खरेदीला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.तरी शेतकरी बांधवांनी समय सुचकता बाळगुण हरभरा पिकांच्या पेरणीचे ई पिक पाहणीची ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.