Just another WordPress site

साकळी येथील प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन ‘कृषीसेवक’ पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ फेब्रुवारी २६ शनिवार

तालुक्यातील साकळी येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी दिपक रमेश महाजन यांना नुकताच कृषिसेवक पुरस्कार देऊन रावेर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात नुकतेच सन्मानित करण्यात आले.रावेरचे आमदार अमोल जावळे व जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के.बी.पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.साप्ताहिक कृषीसेवकच्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरक ठरलेल्या भूमिपुत्रांना कृषीसेवक या मानाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान पुरस्कारप्राप्त शेतकरी दिपक महाजन यांनी शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत एक्स्पोर्ट दर्ज्याची केळी उत्पन्न घेतले आहे त्याचबरोबर रेशीम शेतीतही उत्कृष्ट उत्पादन घेतलेले आहे तसेच शेतीमध्ये जैविक शेतीचा अभ्यास पूर्ण प्रयोग करत उत्तम शेती करत आहे.साकळी परिसरातील त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य इतर शेतकऱ्यांसाठी खरोखर प्रेरणादायी बनले आहे.दिपक महाजन हे आपले वडील प्रगतशील शेतकरी रमेश रामजी महाजन यांचा उत्कृष्ट शेती करण्याचा वारसा पुढे चालवीत आहे हे विशेष आहे.दीपक महाजन यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्या कुटुंबासह गावाच्या गौरवात मोठी भर पडली आहे.सदर मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिपक महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.