यावल येथील बालसंस्कार विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्ताने कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ फेब्रुवारी २६
येथील बाल संस्कार विद्या मंदिरात शिवजयंती निमित्त कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडली.सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित जोशपूर्ण कथाकथन सादर केले.प्रसंगी अफजलखान वध,पन्हाळगडातून सुटका,स्वराज्य स्थापना,एक अपूर्व सोहळा अशा विविध प्रसंगांचे प्रभावी वर्णन विद्यार्थ्यांनी केल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सर्व स्पर्धकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक सुनील माळी होते.स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजेंद्र फालक व सविता वारके यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे संचालन इयत्ता ५ वी च्या विद्यार्थिनी प्रणाली चौधरी व श्रेया कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रतिक्षा चौधरी तसेच परिचय हस्मिता चौधरी आणि आभार भूमिका फेगडे यांनी मानले.सदर कार्यक्रम मोठया आत्मविश्वासाने व सुंदर पद्धतीने सादर करण्यात आला.या कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध प्रेरणादायी कथा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड आणि वक्तृत्व कौशल्य वृद्धिंगत झाले.सदरील स्पर्धेतील विजेते मोठा गट प्रथम जान्हवी पवार,द्वितीय राधिका वाणी तर उत्तेजनार्थ मोक्षदा भोगे हिला मिळाले.लहान गट प्रथम रिद्धी गडे,द्वितीय देवांश वराडे यांनी पटकावला.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी,परीक्षक व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.