Just another WordPress site

यावल जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ फेब्रुवारी २६ शनिवार

येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना महाजन यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला हार अर्पण करून केली.तसेच या कार्यक्रमाला इंग्लिश माध्यम प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे,सेमी माध्यमाच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व इंग्लिश माध्यमाच्या पर्यवेक्षिका गौरी भिरूड यांची उपस्थिती होती.

प्रसंगी शाळेच्या शिक्षिका अर्चना पाटील व ऐश्वर्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी साहित्यक कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली.त्याचप्रमाणे इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचा विस्तार करत नाटक गाणे सादर करून मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपले सूंदर असे मनोगत व्यक्त करून आपल्या मराठी भाषेविषयी आपुलकीची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी भारंबे यांनी केले व कार्यक्रमास उपास्थितांचे आभार सुजाता पाटील यांनी मानले.शेवटी रंजना महाजन यांच्या अध्यक्षीय भाषणांनतर मराठी राज्य भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.