Just another WordPress site

यावल जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहाच्या वातावरणात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ फेब्रुवारी २६ शनिवार

येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्षा रंजना महाजन यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली.तसेच इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे,सुपरवायझर गौरी भिरुड व श्रीमती राजश्री लोखंडे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दिली.

प्रसंगी इयत्ता आठवी सेमी आणि इयत्ता आठवी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान चर्चासत्रात सहभाग घेतला व त्या चर्चासत्रात प्लास्टिक हार्मफुल उसफुल इफर्ट्स या विषयावर चर्चा करण्यात आली.या चर्चेत समर्थ कासार,सुचिता फेगडे,लावण्या नाफडे,हेमांगी पाटील,कार्तिकी महाजन,पायल राणे,आर्या पाटील,भूमिका पाटील,वैष्णवी गडे,अंकिता गायकवाड,आर्या वाणी,वेदिका पाटील,कल्याणी महाजन,भाविका पाटील,पूर्वा पाटील,कार्तिकी भारुड या मुलांनी आकर्षक सायन्स मॉडेल तयार करून आपले होते त्यामुळे विषयी मुलांनी छान माहिती दिली अशा प्रकारे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात दिपाली धांडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले दिपाली जंगली मॅडम हर्षाली बारी मॅडम यांनी मुलांना विज्ञानाविषयी माहिती सांगितली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कविता पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.