Just another WordPress site

यावल बाल संस्कार विद्या मंदिर आणि माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ फेब्रुवारी २६ शनिवार

येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात आज दि.२८ फेब्रुवारी शनिवार रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करून मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एम.गर्गे यांनी भूषविले तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पराग सराफ शिक्षण सभापती,यावल नगरपालिका हे उपस्थित होते.सदर विज्ञान प्रदर्शनात एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात ५३ विद्यार्थ्यांनी मिळून ३४ मॉडेल प्रदर्शनात सादरीकरणासाठी ठेवले होते.दरम्यान विविध विषयांना महत्त्व देत जलचक्र,पाणी शुद्धीकरण,स्मार्ट फायर फायटर वेहिकल,रेन वॉटर हार्वेस्टिंग,थ्रीडी होलोग्रम बॉक्स, अर्थक्वेक डिटेक्टर,वॉटर सायकल,चंद्रयान,ऑब्लिक स्पीड ब्रेकर,पवनचक्की,वायु प्रदूषण,ध्वनी प्रदूषण इत्यादी प्रकल्प सादर केले.यात कौतुकाची बाब म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी देखील आपले विज्ञान मॉडेल तयार करून आपला सहभाग नोंदवला.सदर  विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शनाला संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय महेश वाणी आणि बाल संस्कार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील माळी तसेच सन्माननीय पालक वर्ग यांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.विज्ञान शिक्षक ललित चौधरी,नितीन बारी,सविता वारके यांनी  मॉडेलचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी जान्हवी अतुल पवार हिने प्रभावी रित्या केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी तनुष्का इंगळे हिने केले. कार्यक्रमातील सन्माननीय पाहुण्यांचा परिचय इयत्ता सहावीतील विद्यार्थी यज्ञेश बाविस्कर यांने करून दिला.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.