Just another WordPress site

अनवरदे खुर्द येथे विठ्ठल रुखमाई पालखी सोहळा उत्साहात साजरा !!

महेश बोरसे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.०१ मार्च २६ रविवार

तालुक्यातील अनवरदे खुर्द दरवर्षीप्रमाणे यंदाही समस्त गावकऱ्यांच्या वतीने काल दि.२८ मार्च शनिवार रोजी श्री विठ्ठल रुक्माई पालखीचे आयोजन करण्यात आले.सदर पालखी सोहळा आबालवृद्ध,महीला व पुरुष तसेच नवतरुण युवक-युवती यांनी हिरीरीने सहभाग घेत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

दरम्यान अनवरदे खुर्द येथे श्री विठ्ठल रुखमाई पालखी सोहळ्याचे आयोजन विजय अमृतराव बोरसे,ज्ञानेश्वर पाटील,लक्ष्मण संतोष शिरसाठ,ह भ प बाळासाहेब महाराज व ह भ प बटू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.प्रसंगी दरवर्षीप्रमाणे गावातील सर्व भजनी मंडळांनी पालखीमध्ये सहभाग नोंदवीत पालखी सोहळा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी संपूर्ण गावातून पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली.प्रसंगी ठिकठिकाणी पालखीची पूजा करण्यात आली.सदर पालखीत आबालवृद्ध,महीला व पुरुष तसेच नवतरुण युवक-युवती यांचा सहभाग वाखाणण्या जोगा होता.पालखी सोहळा मिरवणूक विसर्जनानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पालखी सोहळा यशस्वितेसाठी विजय बोरसे,ज्ञानेश्वर पाटील,लक्ष्मण शिरसाठ,ह भ प बाळासाहेब महाराज,ह भ प बटू महाराज,महेश बोरसे यांच्यासह समस्त गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.