माळेगाव ट्रॅफिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी !! शहरात वाहतूक शिस्तीचा नवा आदर्श !!
API सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना व नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २६ बुधवार
माळेगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी,अपघातांची शक्यता आणि काही वाहनचालकांकडून होणारे नियमांचे सर्रास उल्लंघन या पार्श्वभूमीवर माळेगाव ट्रॅफिक पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि धडाकेबाज मोहीम राबवून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.या कारवाईमुळे शहरातील प्रमुख रस्ते,चौक,बाजारपेठ व बसस्थानक परिसरात लक्षणीय शिस्त दिसून येत आहे.
तपासादरम्यान असे आढळून आले की,दूध संकलन सकाळी लवकर किंवा संध्याकाळी होत असल्याने तसेच कचरा संकलन सकाळी व संध्याकाळी केले जात असल्याने या वेळेचा काही चालकांकडून गैरफायदा घेतला जात होता.पहाटे,सकाळी लवकर आणि सायंकाळी ५ नंतर ते उशिरापर्यंत काही वाहने विनापरवाना,अपूर्ण कागदपत्रांसह तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक पोलिसांनी अचानक नाकाबंदी,कडक तपासणी आणि संयुक्त पथकांच्या माध्यमातून व्यापक कारवाई हाती घेतली.वाहनांची कागदपत्रे तपासणे, परवान्यांची पडताळणी,विमा व फिटनेस तपासणी यांसह नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ट्रिपल सीट,हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे,सिग्नल तोडणे,नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे,अवैध प्रवासी वाहतूक तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे अशा प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
सदर कारवाई API सचिन लोखंडे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली.या मोहिमेत PSI तावरे,PSI देविदास साळवे,PSI तुषार भोर,PSI अमोल खटावकर तसेच पोलिस हवालदार काका पाटोळे,अमजद शेख,गणेश खंडागळे आणि नितीन कांबळे यांनी अत्यंत मेहनत व तत्परतेने सहभाग घेतला.त्यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली.
फक्त दंडात्मक कारवाईवर भर न देता पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यालाही प्राधान्य दिले.“वाहतूक नियम तुमच्या सुरक्षेसाठी आहेत” हा संदेश देत वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहनचालनाचे मार्गदर्शनही करण्यात आले.
माळेगाव ट्रॅफिक पोलिसांच्या या प्रभावी,शिस्तबद्ध आणि जनहिताच्या कामगिरीमुळे शहरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.भविष्यातही अशा धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संकेत वाहतूक विभागाने दिले आहेत.