बारामतीत वेश्याव्यवसायावर पोलिसांचा मोठा प्रहार !! लॉजवर छापा टाकत पाच आरोपी जेरबंद तर चार महिलांची सुटका !!
भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई !! आसाम व पश्चिम बंगालमधील महिलांची सुटका !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०६ मार्च शुक्रवार
बारामती तालुका पोलिसांनी शहरातील भिगवण रोड परिसरातील प्रणव लॉजवर छापा टाकत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली.या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून परराज्यातून आणलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत होते आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार सोमनाथ महादेव खोमणे (रा.सावळ,ता.बारामती),धिरज रामभाऊ जाधव (रा.जालना),सागर संजय सोडबुके (रा.बारामती), मेराजुल जानीफ अली (रा.गोलपारा,आसाम),अफजल मझीबर रहमान हुसेन (रा.बरपेटा,आसाम) आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (रा.बरपेटा,आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.५ मार्च रोजी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आरोपींकडून देहव्यापाराचा प्रकार उघडकीस आला.या कारवाईदरम्यान आसाम येथील वय ३०,२१ व २६ वर्षे अशा तीन महिला तसेच पश्चिम बंगाल येथील वय २२ वर्षांच्या एका महिलेची सुटका करण्यात आली.या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करत आहेत.पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील लॉजिंग व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील,धनश्री भगत तसेच पोलीस कर्मचारी नितीन ढवाण,भारत खारतोडे,दादा दराडे,नीलेश वाकळे,सोनाली सूर्यवंशी,स्मिता गायकवाड,चालक आफरीन शेख आणि विठ्ठल तरंगे यांनी यशस्वीपणे पार पाडली.