Just another WordPress site

देवकाते नगर अंधारातच !! डीपी जळण्याच्या मालिकेमुळे नागरिक संतप्त !!

शारदानगर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित !! “कायमस्वरूपी तोडगा काढा” नागरिकांची आर्त हाक !!

सनी पटेल,पोलीस नायक

बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.१७ मार्च २६ मंगळवार

बारामती शहरातील देवकाते नगर (शारदानगर) परिसर सध्या गंभीर वीज समस्येला सामोरे जात आहे.या भागात वारंवार डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) जळण्याच्या घटना घडत असून दोन वेळा डीपी बदलूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वसतिगृहे (हॉस्टेल्स), व्यावसायिक आस्थापने,दुकाने आणि रहिवासी इमारती असल्यामुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.मात्र त्यानुसार वीज यंत्रणा सक्षम न केल्यामुळे संपूर्ण लोड एका डीपीवर येत असून ती वारंवार निकामी होत आहे.परिणामी नागरिकांना सतत अंधाराचा सामना करावा लागत आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे.परीक्षा काळात देखील वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.दुसरीकडे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून व्यवसाय ठप्प होण्याची वेळ येत आहे.काही दुकानदारांनी तर जनरेटरचा आधार घेतला असला तरी त्याचा खर्च परवडणारा नसल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिक नागरिकांनी वारंवार वीज वितरण विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.मात्र संबंधित यंत्रणेकडून केवळ तात्पुरते उपाय केले जात असल्याचा आरोप होत आहे.डीपी जळल्यानंतर नवीन डीपी बसवली जाते पण मूळ समस्या म्हणजेच ओव्हरलोड दूर करण्यासाठी कोणतीही ठोस आणि दीर्घकालीन योजना राबवली जात नसल्याने ही समस्या पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे.नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की,“दर काही दिवसांनी वीज जाते,डीपी जळते आणि आम्हाला अंधारात राहावे लागते व ही समस्या आता सहनशक्तीबाहेर गेली आहे.प्रशासनाने फक्त तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.