यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ मार्च २६ शनिवार
येथील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांच्या संपुर्ण महिनाभरच्या उपवास (रोजे) समाप्तीनंतर आज दि.२१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मौलाना शमीउल्ला अब्दुल कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लीम बांधवांनी सामुहिक नमाजचे पठन केले.जगातील सर्व मुस्लीम बांधवांचा रमजान ईद (ईद उल फित्र) हा पवित्र रमजान महिन्या समाप्ती नंतर येणारा आनंदा व बांधुभावाचा सण असुन महीनाभर उपवास (रोजे) केल्यानंतर चंद्रदर्शनानंतर हा सण साजरा करण्यात येतो.
दरम्यान पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी नविन आर्कषक कपडे परिधान करून शहरातील विविध मस्जिद मध्ये व ईदगाह मैदानावर मौलाना शम्मीउल्ला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नमाज अदा करून ईदगाह मैदानावर हिन्दू मुस्लीम बांधव एकमेकांना ईदची मुबारकबाद देत गळाभेट देतांना दिसुन आले.ईद उल फित्र म्हणजे उपवास तोडण्याचा सण हा दिवस अल्लाहने दिलेल्या शक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि शिस्त,संयम व दानशुरता याचे प्रतिक असल्याचे बोलले जाते.यावेळी ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,काँग्रेस कमेटीचे युवा नेतृत्व धनंजय चौधरी,माजी आमदार रमेश चौधरी,जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे,नगरसेवक रूबाब तडवी, नगर परिषद मधील शिवसेना उबाठा चे गटनेता व नगरसेवक सागर चौधरी,शिक्षण व क्रिडा सांस्कृतीक समितीचे सभापती नगरसेवक पराग सराफ,नगरसेवक उमर कच्छी,नगरसेवक निसार शेख,शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शहर उपप्रमुख संतोष खर्चे,पप्पू जोशी,निलेश बारी,काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष हकीम शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात.कायदा सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.