Just another WordPress site

यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अ प) पक्षाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योती फुले यांची जयंती साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ एप्रिल २६ शनिवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाच्या वतीने थोरसमाज सुधारक क्रांतीसुर्य,ज्ञानसुर्य,युग पुरुष महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत साजरी करण्यात आली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस(अ प)पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात पहीली शिव जयंती साजरी करणारे स्त्री शिक्षणाचे प्रणेते व सर्वप्रथम पुण्यात मुलींची शाळा सुरू करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी भगतसिंग पाटील,अॅड देवकांत पाटील,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,युवक राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे,कदीर खान,विनोद पाटील यावल तालुका कार्यध्यक्ष जितेन्द्र सोनवणे,विलास अडकमोल,सचिन पारधे,पंकज डांबरे यांच्यासह आदि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी थोर समाजसेवक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पाजंली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी सावद्याच्या माजी महिला नगराध्यक्ष सावदा नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते राजेश वानखेडे यांच्या मातोश्री ताराबाई वानखेडे यांचे दुःखद निधन झाले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस यावल पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.