यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रस्त्यावरील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल येथे इयत्ता.१० वीच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा भावनिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.इंग्लीश स्कुलच्या दालनात आयोजीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमेटी सचिव मनिष विजयकुमार पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्कुलचे व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील या होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन इतया ९ वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.
यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील इयता १o वी पर्यंतच्या शैक्षणीक प्रवासाची मनोगत व्दारे माहिती व्यक्त करत अत्यंत भावुक वातावरणात मनोगत व्यक्त केले.तसेच प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उपप्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव,उपशिक्षक सुहास प्रकाश भालेराव यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर अध्यक्षीय भाषणात मनीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत पुढील येणाऱ्या शैक्षणीक अडचणींसाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता दिलीप संगेले,हर्षल मोरे, योगीता बिहारी,देवयानी सोळुंके,मिलींद भालेराव,भावना चोपडे,प्रतिभा धनगर,गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन,संपत पावरा, वैशाली धांडे,शाहरूख खान,प्रतिक तायडे,पुजा शिरोडे,तुषार धांडे,बळीराम कोतवाल,प्रतिभा पाटील,अनिता देशमुख,रामेश्वरी कांबळे,सोनाली कासार,उज्वला नांदूरे,रत्ना बाविस्कर,जागृती चौधरी,बाळासाहेब पाटील आदींनी परिश्रम घेतले.