यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियाना अंतर्गत ‘कौशल्य विकास स्वयंरोजगार ‘या विषयावर कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ.रेखा नितीनराव देशमुख यांनी विद्यार्थिनींना स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर व आत्मविश्वासू होणेबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक युवतीत स्वतःचे कौशल्य नेतृत्व,वकृत्व कर्तृत्व व प्रभुत्व सिद्ध करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा परिणामी यातूनच पुढील काळात महिला सक्षमीकरण होईल व राष्ट्र विकासात भर पडेल असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ.सौ.संध्या सोनवणे यांनी सुद्धा कौशल्य विकासावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील,उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.सुधीर कापडे,डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.डॉ.अनिल पाटील,प्रा.सौ.वैशाली कोष्टी,प्रा.भारती सोनवणे,प्रा.गणेश जाधव,प्रा.संतोष जाधव,प्रा.मयूर सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनिल पाटील यांनी केले.तसेच या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या कोळी हिने केले तर आभार आरती पाटील या विद्यार्थिनीने मानले.