सादिक शेख,पोलीस नायक
धामणगाव बढे (प्रतिनिधी) :-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील देशप्रेम व जातीय सलोखा निर्मितीसाठी जमाते इस्लामी हिंद व एस आय ओ युनिट तसेच जामा मशीद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जामा मस्जिदमध्ये काल दि.२८ एप्रिल २३ रोजी ३३ वे ईद मिलन कार्यक्रम प्रमुख पाहुणे डॉ.सय्यद रफिक पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हारुण खासाब जामा मशीद ट्रस्ट मेंबर हे होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.सय्यद रफिक पारनेरकर यांनी रोजा जातीय सलोखा या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी आम्ही सर्व एकाच आई वडिलांची संतान असून आपआपसात भाऊ बहीण सारखे आहोत.तसेच कोणालाही कुणावर श्रेष्ठत्व प्राप्त नाही श्रेष्ठत्व तर केवळ सदाचारामुळे प्राप्त होते त्याचबरोबर रोजा (उपवास) यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट करताना सांगितले की रोजा फक्त उपाशीपोटी राहणे किंवा तहानलेले राहणे नसून कुणालाही वक्रदृष्टीने पाहू नये,कुणालाही अपशब्द बोलणार नाही तसेच हाता पायांनी चुकीचे वर्तन करणार नाही असा हा रोजा(उपवास)चे महत्व असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी सर्व मानव जातींना गुन्ह्यागोविंदाने व जातीय सलोखा ठेवून एकमेकावर प्रेमाने बंधू भवाने वागावे असे आवाहन केले.या कार्यक्रमाला गावातील हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते व या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी जमाते इस्लामी हिंद व एस आय ओ युनिट यांच्यातर्फे नागरिकांना शीरखुर्मा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.