Just another WordPress site

उंटावद येथे दि.६ मे पासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील उंटावद येथे दिनांक ६ मे २३ शनिवार पासुन दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने ह.भ.प.श्रीराम महाराज यांचे काकाश्री व ह.भ.प.महेश महाराज यांचे वडील तसेच पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी ह.भ.प.श्री भगवान अभिमन पाटील यांच्या वयाच्या ७५ वर्षपुर्ती निमित्त सद्गुरू जोग महाराज संस्थेतील नामवंत किर्तनकार यांचे हरिकिर्तन व श्रीमद् भागवत कथेचेआयोजन करण्यात आले आहे.

सदरील सप्ताह सोहळा दि.६ मे पासून सुरू होत असून या संकिर्तन सप्ताहाच्या दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ ते ६ काकड आरती,सकाळी ७ ते ८ श्री विष्णुसहस्रनाम,सकाळी ९ ते ११ व दुपारी ३ ते ५ श्रीमद् भागवत कथा,संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरिकिर्तन असा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे.तसेच या संकिर्तन सप्ताह दरम्यान दि.६ रोजी विनोदाचार्य ह.भ.प.रामचंद्र महाराज मालपुर (दोंडाईचा),दि.७ रोजी धर्मभूषण ह.भ.प.सतिलाल महाराज,म्हजदी ता.जि.धुळे,दि.८ रोजी शब्दप्रभू ह.भ.प.पोपटजी महाराज कासारखेडे,दि.९ रोजी कीर्तन केसरी ह.भ.प.संजय नाना महाराज धोंडगे,धोंडगे(नाशिक),दि.१० रोजी रामायणाचार्य ह.भ.प.सय्यद महाराज जलाल नाशिक, दि.११ रोजी वाणीभूषण ह.भ.प.पारस महाराज जैन बनोटी ता.सोयगाव,दि.१२ रोजी ज्ञानसिंधू ह.भ.प.अनिल महाराज बार्शीकर,दि.१३ रोजी भागवताचार्य ह.भ.प.शालिग्राम महाराज चितोडा यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ या वेळात होणार आहे.या संकिर्तन सप्ताहदरम्यान गायणाचार्य म्हणून ह.भ.प.उमेश महाराज कळमोदा,ह.भ.प.उमाकांत महाराज मावळे,ह.भ.प.योगेश महाराज,ह.भ.प.संदीप महाराज, ह.भ.प.शहादू महाराज,ह.भ.प.बाळू महाराज,ह.भ.प.भगवान महाराज चिंचोली,ह.भ.प.लिलाधर महाराज किनगाव,ह.भ.प.मधु महाराज डोणगाव,ह.भ.प.एकनाथ महाराज,ह.भ.प.प्रविण महाराज,ह.भ.प.गजानन महाराज पारगाव,ह.भ.प.सुदाम महाराज देवगाव,ह.भ.प.साहेबराव महाराज,ह.भ.प.अशोक महाराज कोळन्हावी,ह.भ.प.भास्कर महाराज,ह.भ.प.नंदु महाराज पुनगाव,ह.भ.प.रेवा महाराज व त्यांचे सहकारी डांभुर्णी,ह.भ.प.शिवदास महाराज आडगाव,ह.भ.प.नरेश महाराज उंटावद,मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प.मुकेश महाराज कळमोदा,ह.भ.प.जनार्दन महाराज पिंपळी,ह.भ.प.विशाल महाराज आडगाव,ह.भ.प.प्रकाश महाराज किनगाव,ह.भ.प.दगडू महाराज धानोरा,ह.भ.प.हेमंत महाराज कोळन्हावी,ह.भ.प.आशिष महाराज उंटावद,ह.भ.प.संदीप महाराज पारगाव,ह.भ.प.केशव महाराज धानोरा,चोपदार म्हणून नारायण महाराज पारगाव,विणेकरी म्हणून ह.भ.प.स्वप्निल महाराज उंटावद,हार्मोनियम वादक म्हणून ह.भ.प.भोजराज महाराज आडगाव,ह.भ.प.राजु महाराज लोणी यांचे सहकार्य लाभणार आहे तर श्रीमद् भागवत कथा वाचन ह.भ.प.पोपट महाराज कासारखेडा हे करणार आहेत तरी परीसरातील भावीकांनी या संकिर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.