शोभायात्रा सुरु होण्यापूर्वी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आल्यानंतर शोभायात्रेस प्रारंभ झाला.शोभायात्रा पोवईनाका शाहू चौक ते राजवाडा अशी काढण्यात आली.यावेळी यात्रेत सहभागी भगवे ध्वजधारी मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.खासदार उदयनराजे भोसले शोभायात्रेत केवळ सहभागी झाले नाहीत तर त्यांनी स्वतः दुचाकी चालवत सातारकरांना सुखद धक्का दिला.उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.ही शोभायात्रा पाण्यासाठी राजपथावर दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या शोभायात्रेत माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे,मनोज शेंडे,सागर पावशे,सागर भोसले,विवेक निकम,जीवनधर चव्हाण,ओंकार कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे उत्तम नियोजन करण्यात आल्याने शोभायात्रा मार्गावर कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही.