Just another WordPress site

अहमदनगरमध्ये संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक नाचविल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

अहमदनगर येथील फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरुन भिंगार कँप पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना काल दि.४ जून २३ रविवार रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली असून पोलिसांनी औरंगजेबाचे फोटो नाचवल्याबद्दल मोहम्मद सरफराज इब्राहिम उर्फ सरफराज जहागीरदार,अपनाम सादिक शेख उर्फ खडा,शेख सरवर,जावेद शेख या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शहराच्या फकीरवाडा भागातील दममारी हजारी मशिदीत दरवर्षी ऊरूस संदल भरवला जातो.यंदा संदल मिरवणुकीत डीजे वाजवण्यात आला यावेळी काही तरुणांनी डोक्यावर मोघल बादशाह औरंगजेब यांची प्रतिमा असलेले फलक झळकावले होते.

यासंदर्भातील ध्वनी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली होती त्याची चर्चा शहरात होत होती त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला आहे.याबाबत पोलीस नाईक नवनाथ धोंडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली असून औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल तर हे इथे मान्य केले जाणार नाही.या देशात,महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात.कुणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.