Just another WordPress site

महाराष्ट्राचे राज्यपाल १० जून रोजी घेणार गजानन महाराजांचे दर्शन

बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस दि.१० जून २३ शनिवार रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून यावेळी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते रात्रीच मुंबईकडे रवाना होणार आहेत.
राज्यपाल बैस हे १० जून शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता अकोला येथून निघून सायंकाळी ६ वाजता शेगावात दाखल होतील.यानंतर शेगाव येथील गजानन महाराज मंदिर येथे ते समाधी स्थळाचे दर्शन घेतील.त्यानंतर संस्थानच्या विसावा अतिथीगृहात त्यांची वेळ राखीव राहणार आहे. विसावा येथून रात्री पावणेनऊ वाजता शेगाव रेल्वेस्थानकाकडे रवाना होणार आहे व रात्री ९ वाजता अमरावती-मुंबई एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रयाण करतील असे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.