नवी दिल्ली,पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ ऑगस्ट २३ गुरुवार
भारताची ४० दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून पृथ्वीपासून चंद्रापर्यंत ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान ३ चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर काल दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी यशस्वीरित्या उतरले आहे.यासह चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया,अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरा देश बनला आहे तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.आता नजर प्रग्यान रोव्हरवर आहे जी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल.एका चाकावर इस्रोचे चिन्ह कोरलेले आहे आणि दुसऱ्या चाकावर अशोक स्तंभ कोरलेला आहे.प्रज्ञान रोव्हर फिरायला लागताच चंद्राच्या पृष्ठभागावर इस्रोचा लोगो आणि अशोक स्तंभ कोरला जाईल.
आता चांद्रयान ३ साठी पुढील काही टप्पे महत्त्वाचे आहेत यात रोव्हर बाहेर येईल,१४ दिवसात काय होईल,इस्रोला कोणती माहिती पाठवली जाईल हि होत.चांद्रयान ३ इतिहास कसा घडवला? इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते चांद्रयान ३ मोहीम चांद्रयान २ चा टप्पा असून तो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल.सदरील चांद्रयान २ सारखे दिसते त्यामध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे. चांद्रयान ३ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे.अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत.चांद्रयान २ मोहीम ज्या कारणांमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकली नाही त्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मिशनने १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा केंद्रातून दुपारी २.३५ वाजता उड्डाण केले आणि नियोजित प्रमाणे काल दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी चंद्रावर उतरले.या मोहिमेमुळे अमेरिका,रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लैंडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.