Just another WordPress site

यावल येथे ईद मिलाद उन नबी सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ सप्टेंबर २३ शुक्रवार

येथील तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने ईद मिलाद उन नबी हा सण मोठया उत्साहाच्या वातावरणात आज दि.२८ सप्टेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने शहरातुन प्रमुख मार्गाने काढण्यात आलेल्या जुलुस मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांनी आकर्षक वस्त्र परिधान करीत आपला सहभाग नोंदविला.ईस्लाम धर्मातील मान्यते नुसार ईद मिलाद उन नबी या दिवशी ईस्लाम धर्माचे अखेरचे संदेशवाहक आणी महान संदेष्टे पैगंबर हजरत मोहम्मंद यांचा जन्म मुस्लिम धर्मियांचे पवित्र मानले जाणारे स्थळ मक्का येथे रबी उल अव्वलच्या १२ दिवशी झाला होता.त्यामुळे त्याच्या जन्मोत्सवाच्या आनंद व्यक्त करण्याकरिता आज दि.२९सप्टेबर शुक्रवार रोजी यावल शहरात ईद मिलाद उन नबी हा सण मुस्लीम बांधवांच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील बुरूज चौकापासुन ईद ए मिलादच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात येऊन मिरवणुक बाबानगर नगीना चौक,बाबुजीपुरा परिसर,सुदर्शन चित्र मंदीर परिसर,डांगपुरा,सराफ पट्टा,बारी वाडा चौक या  मार्गाने शहरातील चोपडा रोडवरील प्रसिद्ध ख्वाजा मस्जिद येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.प्रसंगी मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांसाठी युवकांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.या मिरवणुकीत फैजपुर विभागीय पोलीस उपअधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी,पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे,पोलीस उप निरिक्षक मुजफ्फर पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याकामी आपला बंदोबस्त चोख ठेवला.यावल शहरात आज ईद मिलाद उन नबीच्या निमित्ताने विविध ठीकाणी तरूण मुस्लीम युवकांच्या वतीने गोड प्रसाद ( लंगर ) या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.