Just another WordPress site

वाघाडी बेड्या येथे “आम्ही साऱ्या सावित्री” वस्तीगृहात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मधुसूदन कोवे गुरुजी,पोलीस नायक

यवतमाळ,जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.४ जानेवारी २३ गुरुवार

वाघाडी येथील पारधी बेड्या वर “आम्ही साऱ्या सावित्री” या मुलींच्या वसतिगृहात काल दि.३ जानेवारी बुधवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम स्वराज्य महामंच अध्यक्ष मधुसूदन कोवे गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद चव्हाण स्वातंत्र्याच्या शत्रुसंगे,उत्तमराव खंदारे जिल्हा संयोजक भारत जोडो अभियान,कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती तसेच सर्व सामाजिक कार्यात सहभागी असलेले मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत समाजातील वंचित घटकांतील लोकांपर्यंत,कष्टकरी महिला आणि शाळेत शिकणाऱ्या मुली पर्यंत पोहचला पाहिजे यासाठी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ही बाब प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसुदन कोवे गुरुजी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.”आम्ही साऱ्या सावित्री”या वस्तीगृहात असणाऱ्या मुली या सर्व पारधी समाजातील वंचित घटकांतील आहे आणि हे वस्तीगृह चालवणारी व्यक्ती पपिता मावळे या संस्थेच्या प्रमुख अध्यक्ष आहेत.स्वतः त्यांचा संघर्ष फार मोठा असून मोलमजुरी करुन वस्तीगृहातील मुलींना जगवणे आणि त्यांचे संगोपन करणे आणि शिक्षणाच्या प्रवाहात कायम टिकून राहणे हा साधा संघर्ष नाही.शासनाचे एक रुपयाचे अनुदान नाही मग या समुदायात लोकांनी जगायचे कसे? या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी पपिता माळवे प्रयत्न करीत आहेत.त्याच्या या कार्याच्या निमित्ताने त्यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इशु माळवे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.