“तुकड्याची झोपडी” ही स्मरणिका समाजातील लपलेल्या विचारवंताना उजेडात आणण्याचे कार्य करणार-मधुसूदन कोवे गुरुजी
यवतमाळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जानेवारी २४ गुरुवार
ग्राम स्वराज्य महामंच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या सदैव पाठीशी असल्याबाबत चर्चेत आहे.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच मानवतावादी विचारांचे क्रांतिकारक संत या देशात होवून गेले सदरहू ते विदर्भाचे भुमिपुत्र होते.”या झोपडीत माझ्या ” ही कविता सर्व मानव जातीला समानता,मानवता,राष्ट्रीयत्व आणि स्वाभिमान शिकविते म्हणून “तुकड्याची झोपडी ” ही स्मरणिका मानवतावादी मुल्याची संदर्भ पुस्तिका आहे असे स्पष्ट मत संपादक मधुसूदन कोवे गुरुजी यांनी प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मांडले आहे.
“तुकड्याची झोपडी” या स्मरणिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने भावनाताई गवळी खासदार यवतमाळ-वाशिम लोकसभा यांच्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यात आला.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.वसंत पुरके,माजी आमदार ॲड.वामनराव चटप,माजी आमदार बळवंतराव मडावी कार्याध्यक्ष प्रदेश कमेटी गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि प्रविण देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती आशाताई काळे संचालिका ग्राम स्वराज्य महामंच या होत्या.प्रसंगी कार्यक्रम आयोजनासाठी मुख्य कार्यकारी संचालक मंडळ प्रा.मोहनजी वडतकर,गिरीधरजी ससनकर,रेखाताई निमजे,कृष्णा भोंगाडे,मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांचे अनमोल सहकार्य लाभले.या कार्यक्रमात ११ मान्यवरांना माणिकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.”तुकड्याची झोपडी” स्मरणिका स्पंदन निर्माण करण्यासाठी २१ लोकांचा सहभाग राहिला.तर या स्मरणिका प्रकाशन संकल्प सोहळ्यात हेमंतकुमार ठाकुर मध्यप्रदेश,साहेबराव दामोधरे सेवा निवृत्त प्राचार्य अमरावती,सुनील साबळे दर्यापूर,चैताली भस्मे नागपूर,सर्पमित्र राजेंद्र सतई,प्रिती दिडमुठे चंद्रपूर,उपसरपंच साठगाव वैभव ठाकरे,उपसरपंच हे सदरील माणिकरत्न पुरस्काराकरिता उपस्थित होते.त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव,मारेगाव,कळंब,बाभुळगाव,पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील नागरिक सदर माणिकरत्न पुरस्कार कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात एकता महिला गुरुदेव सेवा मंडळ यांच्या भजन कार्यक्रमातून लोकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैला मिर्झापुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मधुसूदन कोवे गुरुजी यांनी मानले.