मधुसूदन कोवे,पोलीस नायक
यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२९ जानेवारी २४ सोमवार
येथील रिलायन्स फाउंडेशन कंपनीमध्ये पेंटिंग व जाहिरातीचे काम करणारे आणि त्यांनी केलेल्या पेंटिंगला मुकेश अंबानी यांच्याकडून कौतुक करण्यास पात्र असलेले त्याचबरोबर कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन यवतमाळ शहरात स्वखर्चाने मास्क वापरा,घरात रहा, सुरक्षित रहा,तीन फूट सामाजिक अंतर पाया अशा आशयाच्या वाल पेंटिंग करून लोकांच्या मनात एक आदर्श निर्माण करून पेंटिंगच्या माध्यमातून समाजकार्य आणि उत्कृष्ट लिखाण केल्याबद्दल निरंजन गोंधळेकर पेंटर यांना ग्रामसेवराज मंचाद्वारे माणिक रत्न पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले आहे.निरंजन गोंधळेकर पेंटर यांना माणिक रत्न पुरस्कार यवतमाळ येथील मान्यवरांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
पेंटरच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल यवतमाळ येथील गोंधळेकर पेंटर यांना मान्यवर प्राध्यापक बळवंतराव मडावी गोंडवाना गणतंत्र पार्टी यांच्या हस्ते तसेच ग्रामस्वराज मंचाद्वारे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात नुकतेच आले आहे.भावे मंगल कार्यालयात नुकताच पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई काय मुख्य संचालिका ग्रामस्वराज मंच तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भावनाताई गवळी खासदार वाशिम यवतमाळ लोकसभा,माजी आमदार ऍड.वामनराव चटक,विदर्भवादी बळवंतराव मडावी गोंडवाना गणतंत्र पार्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची विचारधारा आणि मानवतावादी विचारांचे जबाबदारी स्वीकारून कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन कोवे अध्यक्ष ग्रामस्वराज मंच,प्राचार्य मोहनजी वडतकर,गिरीधर ससनकर,श्रीमती आशाताई काळे,डॉ. रेखाताई निमजे,कृष्णाजी भंगाळे आणि सर्व सहकारी सदस्य उपस्थित होते.प्रसंगी तुकड्याची झोपडी स्मरणकेमध्ये लेख प्रकाशित केल्याबद्दल आणि माणिक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.