यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार
येथील ‘एक दिवस महाराजांसाठी’ प्रतिष्ठान सामाजीक संस्था व शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात तसेच शिवकालीन व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.यावेळी तारकेश्वर महादेवाच्या मंदिरातून आरती झाल्यानंतर शिवज्योत पेटवून संपूर्ण गावातून शिवज्योत यात्रा काढण्यात आली व सांगता आई रेणुका माता मंदिरात झाली. यावल तालुक्यातील आठ ते नऊ गावातील शिवभक्तांनी राजे निंबाळकर किल्ल्यावर येऊन ही शिवज्योत पेटवून आपल्या गावी पायी चालून नेली हे विशेष !
यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित किल्ल्यावर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या व एसिजी करून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी सुमारे ४० रूग्णांची तपासणी करण्यात आली.सदर आरोग्य शिबिरासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगाव यांच्याकडून सहकार्य मिळाले.येथील एतिहासीक राजे निंबाळकरांच्या किल्ल्यावर शिवपूजन व शिवआरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली व नंतर किल्ल्यावर लहान मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली.या स्पर्धेमध्ये लहान मुलांनी शिवकालीन वेशभूषा सादर करून सर्वांची मन आकर्षित केले.नंतर शिवकालीन चित्र सादरीकरण स्पर्धेमध्ये मुलांनी सहभाग घेऊन किल्ल्याबद्दल माहिती दिली.दरम्यान शिवकालीन आखाडा स्पर्धेत तालुक्यातील व गावातील लहान मुले,मुली,महिला व प्रौढ शिवभक्तांनी सहभाग घेऊन विविध प्रकारच्या पारंपारिक व शिवकालीन शस्त्रकलेचे सादरीकरण केले.या शिवकालीन आखाडा स्पर्धेसाठी गावातील नामांकित वस्ताद रूपचंद घारू यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली व स्पर्धेतील शिवभक्तांना मार्गदर्शन केले.आखाडा स्पर्धेमध्ये यावल येथील छत्रपती शिवाजी आखाडा व महाकाल आखाडा आणि अट्रावल येथील व्हीएसपी क्लासेस आखाडा यांच्या विविध अशा एकूण ४० शिवभक्तांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.सर्व स्पर्धेतील शिवभक्तांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावल तर्फे गौरवण्यात आले.
सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे,भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,वस्ताद रूपचंद घारु,वस्ताद पंकज पाटील,डॉ.अमोल रावते,मनसेचे चेतन आढळकर,डॉ.ललित कुमार,डॉ.साक्षी सातपुते,डॉ.नरेंद्र लव्हाडे,नंदू जाधव, किरण कोळी,कांतीलाल कोळी,भाजपा उपशहराध्यक्ष राहुल बारी,वक्ते विजय कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीते करिता एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अभय रावते यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश वारूळकर,दीपक वारूळकर,सोहम बारी,गोपी बारी,प्राची पाठक,भाग्यश्री पाठक,पौर्णिमा ननवरे,गोलू बारी,धनंजय बारी,लोकेश लाड,तेजस धांडे,वैभव बारी,शुभम कोळी,अक्षय पवार अन्य पदाधिकारी व सदस्य यांनी घेतले.