Just another WordPress site

यावल येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार

येथे समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहाच्या वातावरणात नुकतीच साजरी करण्यात आली.

शहरातील बोरवल गेट परिसरात बंडू दांडेकर यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे श्री विश्वकर्मा या दैवी सुतार व देवतांची शस्त्रे तयार करणारे आणी पौराणिक शहर लंकेचे शिल्पकार होते.त्यांनी पुरी (ओरिसा) येथे जगन्नाथांची महान प्रतिमा व रथ बांधणाऱ्या अशा भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात समाज बांधवांकडून साजरी करण्यात आली.याप्रसंगी श्री विश्वकर्मा सुतार लोहार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्रीराम दयाराम पाटील श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच फालकनगर बस थांब्याच्या ठिकाणी श्रीराम फाउंडेशनच्या सौजन्याने चौकामध्ये श्री विश्वकर्मा चौक असे नामफलक लावून नामकरण करण्यात आले.प्रसंगी श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम दयाराम पाटील व भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पूर्व विभाग अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे व मनसेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर,डॉ.अभय रावते यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश अढळकर, दिलीप अढळकर,रवींद्र अढळकर,बंडू दांडेकर,सचिन मिस्त्री,कृष्णा दांडेकर,कुंदन दांडेकर,हेमंत दांडेकर,राहुल रुले,गोविंदा सुतार,सचिन अढळकर,पप्पू आढळकर,पवन आढळकर,सतीश आढळकर,उदय आढळकर,खुशाल आढळकर,गणेश आढळकर,भैय्या आढळकर, किशोर निवतकर,रघु अढळकर,संजय मोरेकर यांच्यासह महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.