यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ मार्च २४ शुक्रवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री हरी भाविक भक्तांचा आज दि.८ मार्च शुक्रवार रोजी चांगदेव मुक्ताई वारी दौरा आयोजित करण्यात आला असून आज पहाटे ७ वाजता येथील पंचवटी श्री विठ्ठल मंदिरापासून दर्शनादी कार्यक्रम आटोपून दिंडी वारी दौऱ्याची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
सदरील दिंडी वारी हि डोंगर कठोरा येथून श्री स्वामिनारायण मंदिर दर्शन व हा.भ.प.मधुकर चौधरी महाराज यांच्याकडे फराळ कार्यक्रम,श्री.संत मुक्ताई मेहूण दर्शन,श्री.चांगदेव दर्शन,श्रीकृष्ण मंदिर दर्शन,श्री.चक्रधर स्वामी विसावा दर्शन,तापी पूर्णा संगम दर्शन व स्नानादी कार्यक्रम,श्री.संत मुक्ताई कोथळी दर्शन,नवीन मुक्ताई मंदिर दर्शन,हरताळा येथे श्रावणबाळ समाधी व श्री गुरुदेव दत्त दर्शन असे विविध कार्यक्रम आटोपून परत डोंगर कठोरा येथे परतणार आहे. दरम्यान सहभागी हरिभक्तांचा दिंडी सोहळा व भजन कीर्तन श्रवणादी कार्यक्रमात सहभाग लाभणार आहे.या दिंडी वारी सोहळ्यात रवींद्र पाटील,दिलीप झांबरे,निलेश पाटील,पूनम पाटील,जयश्री पाटील,सुलोचना पाटील,साक्षी राणे हिंगोणा,स्वाती जावळे,तिलोत्तमा झोपे,डिम्पल झोपे,शांताबाई धनगर,हेमलता भिरूड,पद्मा भिरूड,लता पाटील,ज्योती राणे,लीना राणे,डिम्पल चौधरी,शालिनी गुरव,निशा जंगले,रुपाली जावळे,लतिका भंगाळे न्हावी,योगिता पाटील यांच्यासह समस्त भाविक हरिभक्त व बालगोपाल यांनी सहभाग नोंदविला आहे.