यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार
मुस्लीम धर्मातील सर्वात पवित्र रमजान ईद ईदगाह मैदानावर तसेच शहरातील विविध ठिकाणच्या मस्जिदमध्ये सामुहिक नमाज पठणानंतर मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने देशात बंधुभाव व शांतता नांदावी या करीता सामूहिक नमाज पठणानंतर अल्लाह कडे प्रार्थना करण्यात आली.
ईस्लाम धर्मातील पाच मुळ तत्वांपैकी एक म्हणुन रमजान महीना ओळखला जातो.प्रत्येक मुस्लीम धर्मातील समाज बांधवास ही पाच मुळ तत्वे पाळवीच लागतात असा अल्लाहने दिलेला आदेश आहे असे म्हटले जाते.दरम्यान रमजानच्या पवित्र महीन्यात रोजा करणे हा प्रार्थना करण्याचा व अल्लाहजवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याचे मुस्लीम बांधव मानतात तसेच स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठी रोजा करणे चांगले असल्याचे म्हटले जाते.दरम्यान यावल शहरात दि.१० एप्रील बुधवार रोजी चंद्रदर्शनानंतर ईदच्या विविध खरेदीसाठी मुस्लीम बांधवांनी प्रमुख बाजार पेठेत एकच गर्दी केली होती.तर काल दि.११ एप्रील गुरूवार रोजी यावल शहरातील प्रमुख ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम समाज बांधवांनी नववस्त्र परिधान करून मौलाना शम्मीउल्ला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरातील विविध मस्जिदीमध्ये ईमाम यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक नमाज पठण करण्यात आले व रमजानच्या पवित्र महीन्यांच्या रोजा (उपवासाची) सांगता झाली.प्रसंगी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले,असलम शेख नबी,हाजी गप्फार शाह, राष्ट्रवादीचे विजय पाटील,कदीर खान फैजान शाह,अनिल जंजाळे,हाजी शब्बीर खान,भगतसिंग पाटील,विजय सराफ,हाजी हकीम खाटीक, नाना बोदडे,हाजी अय्याज खान,सईद शेख यांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या.