२०१४ साली सार्क परिषदेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती त्यानंतर २०१९ साली बिमस्टेक देशांच्या प्रतिनिधींनी शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले होते.माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्या टर्ममध्ये शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.मंगळवारी ४ जून रोजी अठराव्या लोकसभेचे निकाल हाती आले.२०१९ साली भाजपाने ३०३ जागांवर विजय मिळविला होता यावेळी भाजपाला ६३ जागांचा फटका बसला असून भाजपाचे संख्याबळ घटून २४० वर आले.२०१९ साली भाजपाप्रणीत एनडीएने ३५२ मतदारसंघात विजय मिळविला होता यावेळी ही संख्याही घटली.एनडीएने यावेळी २९३ जागांवर विजय मिळवून बहुमताचा २७२ हा आकडा गाठला आहे.आता सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. एनडीएमध्ये सर्वात मोठे घटक पक्ष असलेल्या एन.चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने १६ जागा तर नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाने १२ जागा मिळविल्या आहेत.