यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ जून २४ शुक्रवार
येथील ‘एक दिवस महाराजांसाठी’ प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने दि.६ जून २४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शहरातील प्रसिद्ध राजे निंबाळकर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.या कार्यक्रमात श्याम शास्त्री महाराज यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला राज्याभिषेक पूजन करून सोहळा सुरू झाला.पुजनासाठी अथर्व बयानी महाराज यांनी सहकार्य केले.त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्यापासून गावामध्ये शोभायात्रा काढण्यात आली.सदर शोभायात्रेमध्ये चुंचाळे येथील गुरुमाऊली भजनी व म्युझिकल बँड सोबत वडोदा येथील महिला व पुरुष भजनी मंडळाच्या गजरात शिवरायांची पालखी काढण्यात आली.प्रसंगी शिवरायांचा सजीव देखावा तसेच बुरझड जि. धुळे येथील सरस्वती बँड व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे या शोभायात्रेमधील विशेष आकर्षण ठरले.दरम्यान पुणे येथील प्रवीण चौधरी यांनी शिवरायांची भूमिका साकारली.कार्यक्रमाची सांगता बोरवली गेट येथील शिवतीर्थ येथे करण्यात आली.
सांगता समारोप प्रसंगी शिवतीर्थ येथे सर्वात आधी “शिवरायांचा प्रताप” हे नाटक सादर करण्यात आले.सदरील नाटक धनराज कोळी,खेमराज करांडे,कुणाल चित्ते,ललित बारी,स्वामी चौधरी यांनी सादरीकरण केले.त्यानंतर शिवतीर्थावर शिव वंदना व ध्येयमंत्र घेऊन यावल शहराचे माजी नगरसेवक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते शिवआरती घेण्यात आली.तर पुणे येथील शिवभक्त समाधान लाड यांनी शिवगारद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ‘एक दिवस महाराजांसाठी’ प्रतिष्ठान समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अभय गणेश रावते,उपाध्यक्ष योगेश वारूळकर,धीरज भोळे,प्राची पाठक,धनंजय बारी,सागर चौधरी,मनसे शहराध्यक्ष अजय तायडे,पंकज जोहरी,दीपक वारूळकर,निलेश बारी,सोहम बारी,गोपी बारी,संदीप रेघे,गोलू बारी,सागर लोहार,चेतन बारी,गौरव बारी,ज्ञानेश्वर जाधव,मयूर बारी यांनी परिश्रम घेतले.