यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
तालुक्यात विद्यार्थींच्या शाळा प्रवेशाबाबतची कोंडी कायम असुन यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे काय होणार ? असा प्रश्न पालकवर्गामध्ये उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील डोणगाव रोडवरील किनगावपासून जवळ असलेल्या येथील निवासी इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये ९वी आणी १o वीच्या अनुसुचित जमातीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने पालकांच्या वतीने आज दि.२१ जून शुक्रवार रोजी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर सहा तास आंदोलन करण्यात आले.दरम्यान प्रकल्प अधिकारी व संस्थाचालक तसेच पालकांच्या मध्यस्थीनंतर चर्चा होवुन देखील याविषयी तोडगा निघाला नाही.
यावेळी प्रकल्प अधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत पालकवर्ग व संस्थाचालकांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले.तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या दृष्टीकोणातुन आपण ९ वी च्या विद्यार्थ्यांना वगळून दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवु अशी स्पष्ट भुमिका प्रकल्प अधिकारी व विद्यार्थी पालकासमोर संस्थाचालक विजय पाटील यांनी मांडली.आपण विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होवु देणार नाही तसेच शिक्षण घेतांना बेशिस्तपणाची शाळेत वागणुक देणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी संस्थेने प्रकल्प कार्यालयाकडे तात्काळ पाठवावी अशा सुचना संस्थाचालकांना देण्यात आल्या आहेत.यावर शाळेत काही बेशिस्त वागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चुकांमुळे आपण सर्व विद्यार्थ्यांना वेठीस धरू शकत नाही अशा सुचना व माहीती संस्थाचालकांना देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडीत विषयाला आदिवासी प्रकल्प कार्यालयाने गांर्भीयांने घेतले असुन संबधित इंग्लीश स्कुलच्या संस्थाचालकांना विद्यार्थी प्रवेश का नाकारण्यात आले ? याबाबतची माहीती पत्राद्वारे विचारण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आपण संस्थाचालकांशी संपर्क साधुन आहेत व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळावा या करीता प्रयत्नशील असल्याचे प्रकल्प अधिकारी यांनी म्हटले आहे.या सर्व गोंधळात आपल्या मुलांचे शैक्षणीक भविष्याचे नुकसान होवु नये या विषयाला घेवुन आदिवासी विद्यार्थी पालक चिंतेत असल्याचे दिसुन येत आहे.याविषयी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी प्रवेशाच्या संदर्भात संस्थेला पत्राव्दारे कळविण्यात आले असल्याची माहिती यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी पालकांना दिली.