महेश रामराव बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका प्रतिनिधी :-
दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार
तालुक्यातील अनवर्दे येथे आज दि.२९ ऑगस्ट गुरुवार रोजी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मरी माता यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेत सर्व समाजातील भाविक भक्त मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवून यात्रा मोठ्या आनंदात साजरी करीत असतात.
यात्रेची आख्यायिका अशी आहे कि,सदरील मारीमाता देवस्थान हे जागृत असून याठिकाणी ज्या लोकांच्या मनात काही इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होते तसेच कोणी आजारी पडले व काही मागितले तर ते देखील येथे पूर्ण होते.यामुळे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून यात्रेला एकही वर्ष खंड न पडत गावकऱ्यांच्या वतीने मारीमातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व मनोभावे साजरा करीत असतात.यानिमित्ताने गावातून गहेरगावी नोकरीसाठी गेलेली मंडळी ही या यात्रेनिमित्ताने गावी येऊन या यात्रोत्सवात हिरीरीने सहभाग घेत असतात.त्यामुळे गावातील लोक संघभावनेने सर्व गाव मिळून यात्रा भरवतात.सदरील यात्रा आज दि.२९ ऑगस्ट गुरुवार रोजी मरीआई यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
सदर यात्रेला सरपंच सचिन शिरसाट,सरपंच महेश पवार,ग्रामसेवक रवींद्र सोनवणे,पोलीस पाटील मिलिंद आहिरे,ग्रामपंचायत सदस्य नंदू शिरसाट,धनराज बोरसे,पोलीस नायक तालुका प्रतिनिधी महेश रामराव बोरसे,महेश पवार,सचिन शिरसाट,रवींद्र शिरसाट,संतोष शिरसाट,राजेंद्र भालेराव,रवींद्र शिरसाठ,सचिन धनगर,शेखर बोरसे यांच्यासह गावकऱ्यांचे विशेष सहकार्य मिळत असते.