यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ सप्टेंबर २४ सोमवार
येथिल व्यास शिक्षण मंडळव्दारे संचलित जे.टी.महाजन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांंच्या उपस्थितीत आज दि.२ सप्टेंबर सोमवार रोजी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला.
येथील शाळेच्या परिसरात आयोजीत करण्यात आलेल्या या बैलपोळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या रंजना महाजन यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणुन इंग्लिश मिडियमचे प्राचार्य ज्ञानेश्वर मावळे यांच्यासह शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरूड यांनी आपली उपस्थिती दिली.या प्रसंगी प्राचार्य ज्ञानेश्वर मावळे यांनी बैलजोडीचे पुजन करून बैलांना पुरणपोळीचा नैवेदय दिला.या कार्यक्रमात प्राचार्या रंजना महाजन यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करीत पारंपारीक पद्धतीने साजरा होणाऱ्या बैलपोळा सणाबद्द्ल माहिती सांगितली.तसेच शाळेच्या शिक्षीका हितेश्री यांनी देखील विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन करीत सणाबद्दल माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रद्धा बडगुजर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षीका वंदना चोपडे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.