Just another WordPress site

मोहराळे ग्रामपंचायतच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभारीची चौकशी करण्याबाबत ग्रामस्थांचा एल्गार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-

दि.११ सप्टेंबर २४ बुधवार

तालुक्यातील मोहराळे ग्रामपंचायतीच्या मनमानी व गैरव्यवहारिक (भ्रष्टाचार) कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मोहराळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले.

या संदर्भात मोहराळे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,मोहराळे ग्रामपंचायतच्या माध्यमातुन ग्रामसभा न घेता कार्य करीत आहे.तसेच ग्रामपंचायतच्या वतीने १५ वित्त आयोग अंतर्गत जो विकास आराखडा तयार करण्यात येतो यात गावातील ग्रामस्थांना विचारात घेतले जात नसून गावातील रस्ते,आदिवासी स्मशानभुमी (कब्रस्तान) भुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी असुन देखील सदरील मागणीचा आराखडा तयार करण्यात आलेला नाही.आदिवासी बहुल वस्ती (वाडयात ) तसेच दलित वस्तीमध्ये १५ वित्त आयोगाच्या वतीने कोणतीही सुविधा अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.ग्रामपंचायतच्या वतीने गावात कोणकोणती विकासकामे आराख्याड्यातुन होणार आहे हे देखील ग्रामस्थांना माहित नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.परिणामी ग्राम पंचायतच्या माध्यमातुन विद्यमान सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठया प्रमाणावर भ्रष्ठाचार केला असावा असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सदरहू ग्रामपंचायतच्या वतीने १५ वित्त आयोगामार्फत विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाचे तपशिलवार माहिती ग्रामस्थांना मिळावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.दरम्यान निवासी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे व गटविकास अधिकारी यांचे तक्रार निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना दिलेल्या निवेदनावर असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.