नितेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाणदिवे येथील स्मारकामधील बांधकाम साहित्य काढण्यात आले बाहेर !! नागरिकांनी केले नितेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक !!
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२६ सप्टेंबर २४ गुरुवार
उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीतमधील मौजे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे अशोक शेडगे या व्यक्तीने हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे जल जिवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेले २ वर्षांपासून ठेवले होते.सदरचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तसेच सदरचे हुतात्मा स्मारक ही पाणदिवे गावाचे मंदिर,प्रेरणास्थान आहे तरी सदर प्रेरणा स्थानामध्ये बांधकामचे मटेरियल ठेवून सदर प्रेरणास्थानाचे गोडावून मध्ये रूपांतर करण्यात आले व पाणदिवे गावाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सदर ठेकेदाराने केले होते.सदर व्यक्तीला वारंवार सुचना देवूनही सदर व्यक्ती साहित्य काढत नव्हता.हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली होती त्यामुळे सदर व्यक्ती विरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा व संबंधित व्यक्तीवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे २५ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच हुतात्मा दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला होता.या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम,पिरकोन ग्रामपंचायतचे सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार देखील केला होता.ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांच्या कार्याची व पत्रव्यवहाराची दखल घेत सदर स्मारक मधून बांधकाम साहित्य काढण्यात आले आहे त्यामुळे स्मारक संरक्षित,सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.
याकामी कामगार नेते महेंद्र घरत,ग्रामसेविका उर्मिला पाटील,सरपंच कलावती पाटील,सदस्य-कमलाकर गावंड,समस्या रसिका ठाकूर यांचे नितेश पाटील यांनी आभार मानले आहेत.नितेश पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याने स्मारक संदर्भात समस्या मार्गी लागली मात्र संबंधित ठेकेदारावर कोणतेही कारवाई झाली नाही त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी नितेश पाटील यांनी चिरनेर येथे हुतात्मा दिन(जंगल सत्याग्रह स्मृती दिन )कार्यक्रम प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली व निवेदन दिले तसेच ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार उद्धव कदम व गट विकास अधिकारी यांना बोलावून ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान पाणदिवे येथील कै.परशुराम रामा पाटील हुतात्मा स्मारक येथे कै.परशुराम रामा पाटील यांचे नातू भालचंद्र पाटील यांच्या उपस्थितीत नितेश पाटील व इतर मान्यवरांनी स्मारकचे पूजन करून अभिवादन करत हुतात्मा दिन साजरा केला.