शंभूराज देसाई म्हणाले,मला इथ नमूद करायचे आहे की आमच्यात,महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कोणत्याही प्रकारची चढाओढ नाही,कुठलीही रस्सीखेच नाही. आम्ही चर्चेतून खेळीमेळीच्या वातावरणात मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेऊ तसेच शिवसेनेबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत.आम्ही ठराव करून एकनाथ शिंदेंकडे सर्व अधिकार सोपवले आहेत त्यामुळे शिवसेनेबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर तो केवळ एकनाथ शिंदे घेतील आणि आम्हा सर्व नेत्यांना,आमदारांना,कार्यकर्त्यांना,पदाधिकाऱ्यांना तो मान्य असेल.

केसरकर म्हणाले होते,भाजपा पक्षाश्रेष्ठींच्या सूचनेनुसार सरकार स्थापन होईल.आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची असते मात्र तिन्ही पक्षांनी सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे  एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी व शाह घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य असेल.