Just another WordPress site

यावल पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ एप्रिल २५ मंगळवार

येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अभिवादन,आदरांजली तसेच  विविध कार्यक्रमांनी उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

दरम्यान दि.१४ एप्रील १८९१ हा दिवस समता,स्वातंत्र्य,विश्वबंधुत्व या तिन तत्वावर आधारीत जिवनमार्ग जपणारे देशाचे थोर समाजसुधारक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा सर्वत्र त्यांची जयंती म्हणुन साजरी करण्यात येते.सदरहू येथील श्री व्यास आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलीत सरदार वल्लभभाई पटेल  इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.या निमित्ताने अर्चना महाजन यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी स्कुलचे संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन,प्रशांत फेगडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करीत आदरांजली वाहण्यात आली.यावेळी स्कुलचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.