यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ जुलै २५ बुधवार
सुमारे १३० हुन अधिक वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील ‘ पेहरन-ए-शरीफ’ येथील मुस्लिम बांधवांचा पारंपरिक उत्सव यावर्षी बाबूजीपुरा पंचमंडळीच्या वतीने १० जुलै रोजी साजरा केला जात आहे.सदर उत्सवची शहरातून मिरवणूक काढण्यासंदर्भातचे समितीच्या वतीने येथील पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना नुकतेच पत्र देण्यात आले असून मिरवणूक वीना वाद्य काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या उत्सवात शंभर वर्षाहून अधिक परंपरा आहे व या उत्सवासाठी राज्यासह लगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर,गुजरात व सुरत येथून मुस्लिम बांधव या उत्सवात उपस्थित राहतात.उत्सवात हिंदू मुस्लिम बांधव सहभागी होत असल्याने हिंदू मुस्लिम बांधव बांधवांचा एकीचे प्रतीक म्हणून समजला जातो.
सदरील उत्सवानिमित्ताने उत्सव समितीची स्थापना करण्यात आलेली असून या उत्सवासाठी बाबूजी पुरा पेहरण हे शरीफ समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी शेख नईम शेख शरीफ,उपाध्यक्ष मोहसीनखान गफुरखान,सहसचिव शहीर खान शब्बीर खान,खजिनदार नसिरुद्दीन शहाबुद्दीन व सभासदांमध्ये शेख हबीब गुलाम रसूल,इरफानखान अलियारखान,मेहमूदखान,रियाजोद्दीन शेख सलीम,रिजवान शेख कुतुबोद्दीन,मुस्तफा खान मेहबूब खान,सय्यद फिरोज सय्यद अहमद,मोसिन खान मुसीर खान,शेख अखलाक शेख खलील,गुलाम गौस शेख नबी,निसरोद्यीन अमीरोद्यीन,नईम युनूस खाटीक,वसीमखान नासीरखान,अन्सारोद्यीन इसरारोद्यीन,अरब मसुद सईद यांचा समावेश आहे.